पाकिस्तानात मोबाईल सेवा विस्कळीत

mobile
इस्लामाबाद – तब्बल दहा कोटी नागरिकांचे प्री-पेड मोबाईल पाकिस्तानातील मोबाईल कंपन्यांनी बंद असून नुकत्याच पेशावर येथे शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने दहशतवाद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. याचाच भाग म्हणून सरकारने कंपन्यांना चौकशीसाठी २८ दिवसांची मुदत दिली आहे.

पाकिस्तानात १४ कोटी मोबाईलधारक आहेत. त्यापैकी केवळ १० टक्केच पोस्टपेडधारक आहेत. त्यामुळे ९० टक्के सिमकार्ड धारकांची माहिती अपूर्ण असल्याने ती माहिती पूर्ण करण्याचे आदेश सरकारने बजावले आहेत.

Leave a Comment