न्यू ईयर सेलिब्रेशन; पुण्यात सकाळी पाच वाजेपर्यंत परवानगी

party
पुणे – नववर्षाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक असलेल्या पुणेकरांसाठी एक खुशखबर आहे. न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी पुणे शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लब यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र हॉटेल सुरू ठेवल्यास तेथील सुरक्षेची सर्व जबाबदारी ही त्या-त्या हॉटेलांवर टाकण्यात आली आहे. तसेच थर्टी फस्र्टच्या रात्री शहरात होणा-या पाट्र्यांवर आणि रस्त्यांवर पोलिस करडी नजर ठेवणार आहेत. पुणे शहर व परिसरात सुमारे ८ हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी अडीचशे वाहनांच्या ताफ्यासह गस्त घालणार आहेत.मद्यपींचा धुडगूस रोखण्याची जबाबदारी पोलिसांनी या हॉटेलांवर टाकल्याने हॉटेलांच्या आतील व बाहेरील बाजूलाही पुरेसे खाजगी सुरक्षारक्षक तैनात करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचा आदेश हॉटेल चालकांना देण्यात आला आहे. हॉटेल व रिसॉर्टच्या पाट्र्यांमध्ये अंमली पदार्थांच्या वापरापासून बेकायदा दारू विक्रीचीही तपासणी होणार आहे.

Leave a Comment