आता कळणार ट्विट किती जणांनी वाचले

twitter
मुंबई: मोबाईल अ‍ॅपमध्ये ‘टिवटर’ ने आपले नवे फीचर आणले असून ज्याच्या मदतीने आपण आपले ट्विट किती जणांनी वाचले, रिट्विट केले हे आपल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर दिसणार आहे. यासाठी आपल्याला ट्विटरच्या अ‍ॅनॅलिजिटक्स पेजवर साईन ईन करावे लागेल.

ट्विटरचे सॉफ्टवेअर इंजीनिअरिंग मॅनेजर इयान चान यांनी सांगितले की, या फीचरचा वापर करण्यासाठी आपल्याला ट्विटर अ‍ॅप अपग्रेड करावे लागेल. अपग्रेड झाल्यानंतर ट्विटरवरील आपल्या एखाद्या जुन्या ट्विटवर टॅप करून पाहा. खाली ‘व्यू अ‍ॅनॅलिटिकल डिटेल्स’ नावाने एक लिंक दिसेल.

या लिंकवर जाताच आपल्याला आपल्या त्या ट्वीट संदर्भातील आकडेवारी मिळेल. यात इंप्रेशन्सची संपूर्ण संख्या, आपले ट्विट पाहणा-यांची संख्या दिसेल. तर एंगेजमेंटसच्या रूपात असलेली संख्या म्हणजे रिटिवट, फेवरेट यांची मिळून संख्या असेल.

Leave a Comment