नवी दिल्ली – कार तसेच दुचाकी वाहने जानेवारी २०१५ पासून महाग होण्याची शक्यता असून सरकारकडून वाहन क्षेत्राला मिळणा-या उत्पादन शुल्काच्या सवलतीला मुदतवाढ न देण्याच्या निर्णयामुळे नव्या वर्षात मोटारी, एसयूव्ही मोटारी आणि दुचाकी वाहने महाग होण्याची शक्यता असल्याची माहिती अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिका-यांनी दिली.
२०१५ मध्ये महाग होणार कार, दुचाकी
याआधी यूपीए सरकारने वाहन क्षेत्रात मोटार विक्रीला अधिक चालना मिळावी या दृष्टीने फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मोटारी,एसयूव्ही आणि दोन चाकी वाहनांच्या उत्पादक शुल्कात मोठी कपात केली होती. त्यानंतर मोदी सरकारकडूनही जूनमध्ये उत्पादन शुल्कातील सवलत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.