सिंगापूर – गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ‘क्यू झेड ८५०१’ या एअर एशियाच्या विमानाचे काही अवशेष जावा समुद्रात तरंगताना आढळल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून काही मृतदेहही तरंगताना आढळले आहेत.
समुद्रात सापडले एअर एशियाच्या विमानाचे अवशेष !
हे अवशेष लाल आणि पांढ-या रंगाच्या विमानाचे असून याबाबतचा अधिक तपास सुरु आहे असे इंडोनेशियाच्या वाहतूक मंत्रालयातील हवाई वाहतूकीचे संचालकर जोको मुर्जातमोजा यांनी सांगितले.
विमान शेवटचे रडारावर ज्या ठिकाणी दिसले होते. त्या ठिकाणापासून काही अंतरावर हे अवशेष आढळले आहेत. तसेच काही मृतदेहही तरंगताना आढळले आहेत. हे सर्व मृतदेह पिडीत प्रवाशांचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.