मोदींसोबत टॉप बँकर करणार बस प्रवास

volvo-modi
पुणे – बॅकींग सेक्टर सुधारणांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील टॉप बँकर्ससोबत पुण्यात येत्या २ व ३ जानेवारीला बैठक व चर्चा करणार असून मोदी मुंबई ते पुणे हा प्रवास व्होल्व्हो बसमधून करणार असल्याचे समजते. त्यांच्यासोबत या प्रवासात टॉप बँकर्स व वित्त मंत्रालयातील कांही वरीष्ठ अधिकारी असणार आहेत. यात स्टेट बँकेच्या प्रमुख अरूंधती भट्टाचार्य, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, वित्तमंत्री अरूण जेटली व वित्त मंत्रालयातील अन्य वरीष्ठ अधिकार्‍यांचा समावेश आहे.

पुण्यात होत असलेल्या या बैठकीला ज्ञानसंगम असे नांव दिले गेले असून बैठकीत होणार्‍या चर्चेतून बँकींग सुधारणांसाठी तयार करण्यात येणार्याक अॅक्शन प्लॅनची ब्ल्यू प्रिंट सादर केली जाणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी सर्वाजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या, बँकर्स आणि नाबार्डसारख्या संस्थांना प्रेझेंटेशन करण्यास सांगितले आहे. ही बैठक प्रथम दिल्लीत होणार होती मात्र आता ती पुण्यात घेतली जात आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंटच्या कँपसवर सर्व वरीष्ठांना राहण्याची व्यवस्था केली असल्याचेही समजते.

या बैठकीत बँकांच्या सद्यस्थितीत सुधार होण्यासाठीची उपाययोजना, सरकारच्या नितींमध्ये झालेल्या चुका आणि काय दुरूस्त्या गरजेच्या आहेत यावरही चर्चा केली जाणार आहे.

Leave a Comment