दुबईत १ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या शॉपिंग फेस्टीव्हलचे यंदाचे मुख्य आकर्षण असेल एक सोनसाखळी. ही सोन्याची चेन अशीतशी नाही तर ती तब्बल ५ किलोमीटर लांबीची आहे आणि त्यासाठी १८० किलो सोन्याचा वापर केला गेला आहे. या साखळीमुळे दुबईचे नांव गिनीज रेकॉर्डमध्ये येईल असे प्रयत्न केले जात आहेत.दुबई सेलिब्रेशन असे या सोनसाखळीचे नामकरण केले गेले आहे.
दुबईत बनतेय महाप्रचंड सोनसाखळी
संयुक्त राष्ट्र अमिरातीने ही साखळी बनविली असून त्यासाठी दुबई गोल्ड अॅन्ड ज्युवेलरी ग्रुपने देथील चार बड्या सराफांचे सहकार्य घेतले आहे. दुबई फेस्टीव्हलचे हे २० वे वर्ष आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात कुणाला सहभागी व्हायचे असेल तर त्याने सोने जमा करायचे आहे. फेस्टीव्हल संपल्यानंतर त्यांनी दिलेल्या सोन्याच्या वजनाइतका साखळीचा तुकडा तोडून त्यांना दिला जाणार आहे. हवे असल्यास त्या वजनाचे ब्रेसलेटही मिळू शकणार आहे. या साखळीसाठी ७० कारागीर रोज १० तास काम करत आहेत.
फेस्टीव्हलमध्ये ही महाप्रचंड साखळी २०० मीटर लांब जागेत ठेवली जाणार आहे. तिच्या संरक्षणाची जबाबदारी दुबई पोलिस व वाहतूक विभागाकडे सोपविली गेली आहे.