गॅलेक्सी अल्फा बंद होणार?

alfa
सॅमसंगने त्यांच्या आकर्षण स्मार्टफोन मालिकेतील गॅलेक्सी अल्फा येत्या कांही आठवडयात बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी आहे. गॅलेक्सी अल्फाच्या जागी कंपनी गॅलेक्सी ए फाईव्ह आणणार असून हा फोन दक्षिण कोरियात जानेवारी २०१५ च्या अखेरी अथवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर करणार आहे असेही समजते.

गॅलेक्सी अल्फा बंद करून त्या जागी ए फाईव्ह आणण्याचा कंपनीचा निर्णय स्वस्त डिव्हायसेससवर कंपनी फोकस करत असल्याचे संकेत देण्यासाठी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सॅमसंग त्यांच्या ए सिरीज लाईनअपकडे अधिक ग्राहकांना आकर्षित करू शकेल असा दावा केला जात आहे. या लाईनअपमध्ये सहज परवडणार्‍या किंमतीत मेटल बॉडी, आकर्षक डिझाईन व अनेक फिचर्स असलेले स्मार्टफोन सादर केले जात आहे. गॅलेक्सी अल्फा साठीही मेटल बॉडी, आकर्षक डिझाईन होते मात्र त्याची किंमत अधिक असल्याने या स्मार्टफोनला ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता असेही समजते.

Leave a Comment