हॉटेल-बारमालक सोडणार तळीरामांना घरी

drunker
मुंबई – नववर्षाच्या पार्टीत बेधुंद झालेल्या तळीरामांना घरी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी बारमालकांवर असून मद्यपींवर कारवाईसोबतच बारमालकांसाठी आचारसंहिता मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने काढली आहे. बारबाहेर होणारी वाहतूक कोंडी टाळणे, विनापरवाना मद्यविक्री करणे तसेच अति मद्यपान करणार्‍यांना घरी सोडण्याची व्यवस्था करणे अशा जबाबदार्‍या मालकांवर आहेत. गेल्या तीन दिवसांत पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवणार्‍या २४९ जणांविरुद्ध कारवाई केली आहे.

बारमालकांना “दारू पिऊन गाडी चालवू नये’ असे फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचे पालन झाल्यास कारवाई करणार असल्याचे वाहतूक विभागाचे सहआयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले. सध्या आठवडाभरापासून दीड हजार पोलिस विविध रस्त्यांवर तैनात आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्री सशस्त्र दलाचे पोलिसही तैनात असतील.

Leave a Comment