‘हवामान अंदाज’ परिभाषेत होणार आमूलाग्र बदल

weather
नवी दिल्ली : देशात हवामानाचा अंदाज वर्तविणा-या परिभाषेत लवकरच आमूलाग्र बदल होणार असून नुकतीच राजधानी दिल्ली येथे भू-विज्ञान मंत्रालयाची विशेष बैठक पार पडली. यात नव्या परिभाषेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सरकारने याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. हवामानाच्या बदलत्या स्वरूपावर चर्चा करण्यासाठी आयोजित या बैठकीत भू-विज्ञान मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि या मंत्रालयाचे सल्लागार डॉ. एम. राजीवन सहभागी झाले होते. बैठकीनंतर डॉ. राजीवन यांनी नागपुरातील युवा हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली आणि बैठकीत चर्चा झालेल्या विषयांची माहिती दिली. गेल्या जून आणि सप्टेंबर महिन्यात भू-विज्ञान मंत्रालयात माझ्या डॉ. राजीवन यांच्यासोबत काही महत्त्वाच्या बैठका झाल्या होत्या. यात हवामानाचा अंदाज वर्तविणा-या परिभाषेत बदल करण्याचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित झाला.

Leave a Comment