सरकारला पडला माळीणच्या पुनर्वसनाचा विसर

malin
पुणे : आज पुणे जिल्ह्यातल्या माळीण दुर्घटनेला ५ महिने झाल्यानंतरही या प्रलयातून बचावलेले गावकरी आजही तात्पुरत्या निवाऱ्यामध्येच राहत आहेत. अनेक नेत्यांनी माळीणच्या संपूर्ण पुनर्वसनाची घोषणा या प्रलयानंतर केली होती. पण, पाच महिन्यानंतर या घोषणा हवेत विरल्याचे चित्र दिसत आहे. पुनर्वसनासाठी योग्य जागा मिळत नाही असा अधिकाऱ्यांचा हेका असल्यामुळे या दुर्घटनेमध्ये सर्वस्व गमावलेल्यांना आता फक्त पत्र्यांच्या शेडचा आधार आहे. फक्त घरच नाहीत तर उद्ध्वस्त झालेल्या शाळेचीही अशीच अवस्था असल्यामुळे माळीण दुर्घटनेला ५ महिने उलटल्यानंतरही उघड्यावर राहणाऱ्या या गावकऱ्यांची मनातील वेदना काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत.

सरकारच्या घोषणा, मंत्र्यांचे दौरे, वरवरची आश्वासने झाली. पण, प्रत्यक्षात काहीच नाही. ना जमिनदारांच्या जमीनी घेतल्या गेल्या, ना गावकऱ्यांचे पुनर्वसन झाल्यामुळे आता या गावाचे पुनर्वसन होण्यासाठी सरकार कशाची वाट पाहते काय? असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.

Leave a Comment