शेतक-यांच्या आत्महत्येला राज्यकर्ते आणि धोरणच जबाबदार

khadse
अकोला : शेतकऱ्यांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी आता मात्र आपली भूमिकेत यु टर्न घेत शेतक-यांच्या आत्महत्येला राज्यकर्ते आणि धोरणच जबाबदार असल्याचे वक्तव्य अकोला येथे केले आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या वतीने आयोजित तीन दिवसांच्या ‘एग्रोटेक २०१४’ च्या उद्घाटन समारंभात कृषिमंत्री खडसे बोलत होते. दरम्यान माझ्या वक्तव्याचा माध्यमे विपर्यास करतात, अशी टीकादेखील त्यांनी यावेळी केली. तसेच अकोट कृषि उत्त्पन्न बाजार समितीमध्ये भाऊ आणि पुतण्यावर केलेले आरोप राजकीय हेतूने झाल्याचे खडसे यांनी सांगितले. अकोट कृषि उत्त्पन्न बाजार समितीमध्ये १ कोटी ४४ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या भ्रष्टाचारावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तांत्रिक सेवा पुरविण्याचे कंत्राट मसेर्स के. जी. खडसे यांच्या मालकीच्या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप बाजार समितीचे सचिव राजकुमार मावळे यांनी केला आहे. या संदर्भातील फौजदारी तक्रार दाखल करून घेण्यासाठी अकोट पोलिस टाळाटाळ करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. मात्र या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment