पाकमधील फाशीवर युनोची बंदी

ban-ki-moon
संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्र संघाने पाकिस्तान सरकारला पाकिस्तानात फाशीवरील उठवण्यात आलेल्या बंदीवर पुन्हा निर्बंध घालण्यात यावा, असा आदेश दिला असून पाकिस्तान सरकारने फाशीवर पुन्हा बंदी घालावी, असे बजावले आहे. हा आदेश संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव बान की मून यांनी बजावला आहे.

पाकिस्तानने फाशीवरील बंदी पाकिस्तानमध्ये घडलेल्या पेशावर येथील आर्मी स्कूलवरच्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर उठवली होती. काही दहशतवाद्यांना फासावरही चढवण्यात आले होते. मात्र या फाशीला आता संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिवांनी हरकत घेतली आहे. पेशावरच्या शाळेवर झालेल्या हल्ल्यात १५० लोकांचे प्राण गेले होते. यात मोठ्या प्रमाणावर लहान शाळकरी मुलांचा समावेश आहे. बान यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, बान यांची दि. २५ डिसेंबर रोजी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी फोनवर चर्चा झाली. या हल्ल्याचा त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला. अशा कठिण परिस्थितीला सामोरे जात पाकिस्तान सरकार देत असलेल्या दोषींच्या फाशीला थांबवण्याचे आदेश संयुक्त राष्ट्रा संघाचे महासिचव बान की मून यांनी या चर्चेदरम्यान केली आहे. मृत्युदंडाच्या शिक्षेबाबत देण्यात येणा-या फाशीवर पुन्हा पाकिस्तान सरकारने बंदी घालावी, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. महासचिव आणि पंतप्रधान यांच्यातील चर्चेतून लोकतंत्र, कायदा आणि स्वतंत्र न्यायालयाची गरज त्यांनी यातून व्यक्त केली. दशहतवादाविरोधातील पाकिस्तानच्या भावनेला आम्ही समजू शकतो, मात्र दोषींना देण्यात येणारी फाशी पाकिस्तान सरकारने थांबवावी आणि त्यावर पूर्वीसारखी बंदी आणावी, अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Leave a Comment