दुष्काळग्रस्त गावांसाठी ‘जलयुक्त शिवार योजना’

pankaja-munde
पुणे: ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दुष्काळग्रस्त गावांसाठी राज्य सरकार लवकरच जलयुक्त शिवार योजना सुरु करणार असल्याची माहिती पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी दिली.

दरवर्षी राज्यातली ५ हजार गावे जलयुक्त शिवार योजनेतंर्गत निवडली जातील आणि या योजनेच्या माध्यमातून या गावांमधील दुष्काळ कायमस्वरुपी घालवण्यास राज्य सरकार प्रयत्नशील असेल असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

याशिवाय ५ हजार कोटींच्या निधीची आवश्यकता या योजनेला असून सध्या यासाठी राज्य सरकारने १ हजार कोटी रूपये मंजूर केले असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

Leave a Comment