थंडीचा जोर वाढला, नागपुरात नीचांकी तापमान

cold
पुणे : शनिवारपासून पुन्हा कमी झालेला थंडीचा कडाका वाढला असून राज्यभरात सगळीकडे हुडहुडी भरली आहे. काही शहरांचे किमान तापमान वेगाने घसरत आहे. नागपूरमध्ये सर्वांत कमी ६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ नाशिकमध्ये ६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे.

थंडीची लाट देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये आली आहे. तिथून बोचरे वारे राज्यात वेगाने वाहत असल्याने पुन्हा पारा घसरू लागला आहे. परिणामी संपूर्ण राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट पसरली आहे. नागपूरचे किमान तापमान सरासरीपेक्षा तब्बल ५.६ अंश सेल्सिअसने कमी झाले होते.

त्यापाठोपाठ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचे तापमान घटले होते. पुढील ४८ तासांत राज्याच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

Leave a Comment