अमेरिकेला उत्तर कोरियाने धमकावले

north-korea
सियोल : अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये गेल्या कांही दिवसांपासून सोनी पिक्चर्सवर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर तणावाचे वातावरण असून परिणामी दिवसेंदिवस त्यांच्यातल्या संघर्षांला खतपाणी मिळत असल्यामुळे पुन्हा अमेरिकेला उत्तर कोरियाने धमकावण्याचे धाडस केले आहे. ‘द इंडरव्ह्यू’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर बौखलाए उत्तर कोरियाने राष्ट्रपती बराक ओबामा यांना माकडाची उपमा देत त्यांची खिल्ली उडवली आहे. तर अमेरिकेने इंटरनेट सेवेत अडथळे निर्माण केल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला आहे.

सोनी पिक्चर्सवर झालेल्या सायबर हल्ल्याबाबत उत्तर कोरियाने आपला सहभाग असल्याबाबत स्पष्ट नकार दिला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावरच बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी आपल्या प्रतिक्रीयेनंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली होती. उत्तर कोरियाने नॅशनल डिफेंस कमीशनने म्हटले आहे की, द इंटरव्यूच्या प्रदर्शनाच्या पाठिमागे ओबामा यांचा हात आहे. एका प्रवक्त्याने म्हटले आहे की, ओबामा सतत दुनियाभर भटकत राहतात. त्यांचे काम हे भूमध्ये जंगलातील माकडासारखे आहे. त्यांनी आरोप केला आहे की, सोनी हैकिंग प्रकरणानंतर अमेरिकेने उत्तर कोरियाच्या वेबसाईटवर सतत हल्ले चढवले होते. ज्यामुळे इंटरनेट सेवांत अडथळे निर्माण झाले होते. प्रवक्त्याने म्हटले आहे की, जर उत्तर कोरियाच्या इशा-यानंतर अमेरिकेने आपला अहंमभाव सोडला नाही. त्यामुळे त्याचे परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील अशी धमकीच आता उत्तर कोरियाने दिली आहे.

Leave a Comment