मुंबईतील आयआयटी विद्यार्थ्यांची कॅट परीक्षेत बाजी

cat-exam
मुंबई – मुंबईतील तीन विद्यार्थ्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सामायिक प्रवेश परीक्षेत (कॅट) बाजी मारली असून हर्षवीर जैन, विभू गुप्ता आणि अनुराग रेड्डी अशी त्यांची नावे आहेत. त्यांना १०० पर्सेन्टाइल गुण आहेत. हे तिघेही आयआयटी पवईचे विद्यार्थी आहेत. देशभरातून एक लाख ६७ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. ऑफलाइन म्हणजे पेनपेपर आणि ऑनलाइन अशा दोन्हीपैकी एक पर्याय निवडून विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. हर्षवीर जैन मूळचा इंदूरचा; तर अनुराग रेड्डी मूळचा हैदराबादचा आहे. यातील हर्षवीरने पवई आयआयटीत शिक्षण घेतले. आता तो नोकरी करतो. विभू गुप्ता मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात शिकतो. तो मूळचा मुंबईचा आहे. तो कांदिवलीत राहतो.

Leave a Comment