न्यू यॉर्क: फेसबूकने आपल्या युजर्सला येणाऱ्या नव्या वर्षात मागील वर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘इअर इन रिव्ह्यू’ची भेट दिली होती. मात्र या भेटीने मनस्ताप घडवला असल्याची भावना युजर्समध्ये निर्माण झाल्यामुळे फेसबुकने दिलगिरी व्यक्त केली आहे.
सुखद गोष्टींसोबतच काही दुखद गोष्टींचे फोटोदेखील ‘इअर इन रिव्ह्यू’मध्ये पाहायला मिळाल्यामुळे फेसबूकने आपल्या दुखावलेल्या युजर्सची माफी मागितली आहे.
फेसबुकने केली दिलगिरी व्यक्त
फेसबूकने आपल्या सर्व युजर्ससाठी ‘इयर इन रिव्ह्यू’ व्हिडिओ तयार केला आहे. यामध्ये युजर्सच्या आठवणी ताज्या करण्यासाठी काही क्षणचित्रांचा समावेश केलेला आहे. मात्र या चित्रांमध्ये काही मृत व्यक्तींचे फोटोदेखील दिसत असल्याने काही लोकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.