देशातील सायबर गुन्हेगारीत ४० टक्क्यांनी वाढ - Majha Paper

देशातील सायबर गुन्हेगारीत ४० टक्क्यांनी वाढ

cyber-crime
नवी दिल्ली : तब्बल ४० टक्क्यांची देशभरात मागील दोन वर्षांत सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून नॅशनल सायबर रेकॉर्डस ब्यूरोने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार यामध्ये वेबसाइट्स हॅकिंग, अश्लील साहित्य अपलोड करणे, क्रेडिट कार्ड आणि बँकिंग क्षेत्रातील फसवणूकीची प्रकरणांचा समावेश आहे.

या वाढत्या सायबर गुन्हेगारीमुळे चिंतीत असलेल्या केंद्र सरकारने या गुन्हेगारीचा निपटरा करण्यासाठी प्रभावी धोरण तयार केले असून एक विशेषज्ज्ञांची समिती देखील गठीत केले आहे. गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०१३ मध्ये सायबर गुन्ह्यांची ७१,७८० प्रकरणे समोर आली आहेत. तर २०१२ मध्ये त्याची संख्या २२ हजार इतकी होती. परंतु यावर्षी जून पर्यंत ६२,१८९ सायबर गुन्हे समोर आली आहेत. २०१३ मध्ये जगभरात पसरलेल्या विविध हॅकर ग्रुपकडून भारताच्या२४,४८१ वेबसाईट्स हॅक केल्या होत्या. २०१२ मध्ये २७,४०४ आणि २०११ मध्ये २१,६६९ घटना उघडकीस आल्या. अश्लील सामग्री पसरविणे, अनधिकृत सामग्रीचे प्रसारण करणे, क्रेडिट कार्ड आणि बँकिंग फसवणूक जगात सर्वसामान्य मानली जाते. गृहमंत्रालयाच्या एक आधिका-याच्या मतानुसार, मागी दोन ते तीन वर्षादरम्यान सायबर गुन्ह्यात वर्षाला ४० टक्के वाढ नोंदविली गेली आहे.

Leave a Comment