जी-मेलवर चीनी ड्रगनची बंदी

gmail
बिजिंग – चीनने सरकारी गुगल सर्च इंजिननंतर आता जी-मेलची सेवा आदेशाद्वारे बंदी न लादता बंद करण्यासाठी वेगळ्या मार्गाचा अवलंब केल्यामुळे येथे जीमेल सेवेचा वापर शून्य झाला आहे. जीमेल सेवा बंद करण्याचा निर्णय याच कारणामुळे सरकारने घेतला आहे. यापूर्वी २००९मध्ये चीनकडून जाएंट सर्च इंजिन म्हणून प्रसिद्ध असलेले गुगल सर्च बंद केले होते. त्यानंतर चीनमधूनच जी-मेल हॅक होण्याचे प्रकार केले जात होते. जेनेकरुन इंटरनेट युझर्स जी-मेलचा वापर बंद करुन देशातील अन्य ई-मेलचा वापर करतील.

चीनमध्ये जी-मेलचा वापर गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे बंद होता. चीनने आपल्या फायरवॉलचा उपयोग करुन देशातील जी-मेल सेवा जवळ-जवळ बंद करुन टाकली आहे. अर्थात चीनने जी-मेल बंद केल्याचा सर्वाधिक त्रास चीमधील विदेशी कंपन्यांना होणार आहे. ज्यांच्याकडून जी-मेलचा सर्वाधिक वापर केला जातो.

Leave a Comment