ग्राहकांकडून वसूल होणार महागड्या वीजेचा भार ?

tata-power
मुंबई – वीज वितरण, पारेषण कंपन्या आणि ग्राहक संघटना टाटा पॉवरच्या तेलावर चालणार्‍या संचातून एप्रिल, मे, जून आणि ऑक्टोबर-२०१४ या काळात निर्मिती केलेल्या महागड्या विजेचा सुमारे ५०० कोटी रुपयांचा बोजा कोणावर टाकायचा यावरून समोरासमोर उभ्या ठाकल्या असून राज्य वीज नियामक आयोगातील सुनावणींमध्ये यावर बराच वाद सुरू आहे. मुंबईबाहेरून शहरात वीज वाहून आणण्याची क्षमता मर्यादित असल्याने ही महागडी वीज वापरली जात आहे. शहरात वीजनिर्मिती करण्यावर बंधने आहेत. कोळशापासून वीजनिर्मिती स्वस्त असली, तरी प्रदूषणामुळे त्यात वाढ करता येत नाही. त्यामुळेच टाटांच्या तेलावर चालणार्‍या संचातून ५०० मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येते. ही वीज प्रतियुनिट ११ ते १३ रुपयांच्या घरात जाते.

Leave a Comment