जकार्ता – इंडोनेशियाच्या बेलितुंग बेटाजवळ जावा समुद्रात एअर एशियाचे बेपत्ता विमान `क्यूझेड ८५०१’ चे अवशेष आढळल्याचे वृत्त असून इंडोनेशियाचे वाहतूक मंत्री इग्नेसियस जोनान यांनी हे वृत्त फेटाळले आहे आणि ही केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.
इंडोनेशियाच्या बेपत्ता झालेल्या विमानाला जलसमाधी!
इंडोनेशियाच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पूर्व बेलितुंग तैमूरच्या जवळ पाण्यात एक विमान दुर्घटना झाल्याची माहिती मिळाली आहे. एका अधिका-याच्या मते एअर एशियाची फ्लाइट क्रमांक `क्यूझेड ८५०१’ हेच बेलितुंग बेटाजवळ दुर्घटना झालेले विमान असू शकते.
दरम्यान, रविवारी पहाटे इंडोनेशियाहून सिंगापूरला निघालेल्या एअर एशियाच्या विमानाशी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे पाच वाजेपासून संपर्क तुटल्यामुळे प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. विमानात प्रवासी आणि कर्मचा-यांसह १६० हून अधिक लोक होते. दरम्यान, घटनेनंतर एअर एशियाने त्यांचा लोगो आणि फेसबूक पेज ब्लॅक केले आहे.
विमानात सर्वाधिक इंडोनेशियाचे १४९ नागरिक आहेत. तर कोरिया तीन तसेच सिंगापूर ब्रिटनचा प्रत्येकी एक नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे. त्यात एका नवजात आणि एका १० वर्षीय बालकाचाही समावेश आहे. ट्रान्सपोर्ट मंत्रालय विमानतून प्रवास करणा-या प्रवाशांची यादी तयार करत आहे.