४१ वा `महाराष्ट्र केसरी’ ठरला जळगावचा विजय चौधरी

maharashtr-kesari
नगर – महाराष्ट्र थंडीच्या कडाक्याने कुडकुडत असताना अहमदनगरच्या मातीत शड्डू ठोकत कुस्तीच्या फडात महाराष्ट्र केसरीचा शेवटचा सामना अहमदनगर येथे पार पडला. या स्पर्धेत `महाराष्ट्र केसरी’च्या यंदाचा मानकरी जळगावचा विजय चौधरी ठरला. विजयने पुण्याच्या सचिन येलभरवर मात करत हा बहूमान पटकावला.

महाराष्ट्र केसरीचा बहूमान आपल्या वडिलांना पटकावता न आल्याने आपण तो पटकावून वडीलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचे अशी मनाशी गाठ बांधून मैदानात उतरलेल्या विजयने आपले नाव सार्थ ठरवले.

मॅटवरील कुस्तीचा विजेता सचिन येलभर आणि मातीतला विजेता विजय चौधरी यांच्यात महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याला सुरूवात झाली. या सामन्याने लवकरच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आणि विजयच्या चपळ खेळीने सचिनवर एकेरी पट काढून मात केली.

Leave a Comment