हिरे कटींग पॉलिश उद्योगाला चीनचे मोठे आव्हान

diamond
मुंबई – जगात हिरे कटींग आणि पॉलीश व्यवसायाची भारताची परंपरागत असलेली मक्तेदारी चीनच्या कडव्या आव्हानामुळे संकटात आली असल्याचे समजते. भारतात कित्येक वर्षापासून कच्च्या हिर्‍याना पॉलिश व कटींग करून त्यांची निर्यात करण्याचा व्यवसाय जोरात आहे. यासाठी कच्चे हिरे अॅटवर्प, तेल अवीव, दुबई ट्रेडिंगच्या रूटने भारतात आणले जातात मात्र भारताचा हा स्थापित रूट मोडण्यात चीनला यश आले असल्याने या व्यवसायात चीनने भारतापुढे आव्हान उभे केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चीनने आफ्रिकेतल्या हिरे खाणींमध्ये गुंतवणूक करून त्याचे स्टेक घेतले आहेत. यामुळे येथून थेट हिरे मिळविणे चीनला शक्य झाले आहे. परिणामी चीनच्या हिरे निर्यात व्यवसायात गेल्या पाच वर्षात ७२ टकके वाढ नोंदविली गेली असून हा व्यवसाय ८.९ अब्ज डॉलर्सवर गेला आहे. भारतात याच दरम्यान व्यवसायात ४९ टक्के वाढ नोंदविली गेली असून भारताचा हा व्यवसाय १४ अब्ज डॉलर्सवर आहे.

असोचेमच्या आकडेवारीनुसार गेल्या दहा वर्षात ग्लोबल पॉलिश्ड डायमंड मार्केटमध्ये चीनचा हिस्सा तिप्पट होऊन तो १७ टककयांवर गेला आहे. भारताचा हिस्सा १९ ते ३१ टक्क्यांमध्ये आहे. चीनचे आव्हान लक्षात घेऊनच पंतप्रधान मोदी यांनी रशियाशी कच्च्या हिरे पुरवठ्यासाठी थेट करार करण्यास प्राधान्य दिल्याचे सांगितले जात आहे.गुजराथेत हा व्यवसाय मोठा आहेच पण भारतात तो संघटीत स्वरूपात आहे. चीनमध्ये तो संघटीत नाही व तेथे लेबर कॉस्टही जास्त आहे. परिणामी छोट्या हिर्‍यांवर तेथे अधिक भर आहे तर मोठ्या आणि महाग हिरयाना अजून तरी भारताशिवाय पर्याय नाही असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

Leave a Comment