रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आर वॉलेट अॅप्लिकेशनची सुरुवात

suresh-prabhu
मुंबई : रेल्वेने आर वॉलेट नावाचे अॅप्लिकेशन तयार केले असून आजपासून मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या लोकल ट्रेनचे तिकीटही आता मोबाईलवर उपलब्ध होणार असून या सेवेचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री आणि शिवसेना आमदार सुभाष देसाईदेखील उपस्थित होते.

ही सुविधा रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करुन दिली असून त्यासाठी खास आर वॉलेट अॅप्लिकेशनही बनवण्यात आले आहे. हे अॅप डाऊनलोड केले की तुम्हाला लोकलचे तिकीट काढता येईल. हे अॅप तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येणार आहे. हे अॅप डाऊन केल्यानंतर, तुमचा मोबाईलनंबर आयआरसीटीसीकडे नोंदवावा लागेल. त्यानंतर ज्या मार्गावर प्रवास करायचा आहे, त्या मार्गाचे तिकीट निवडून, नेट बँकिंगद्वारे तिकीटाची रक्कम भरावी लागेल. नेट बँकींगद्वारे तिकीटाचे पैसे भरल्यानंतर रेल्वेकडून एक मॅसेज येईल. या मॅसेजवरून तुम्ही स्टेशनवरील मशिनद्वारे तिकीटाची प्रिंट काढू शकाल. या हायटेक रेल्वे तिकीट सोयीमुळे मुंबईतील प्रवाशांचा खासकरून चाकरमान्यांच्या वेळीची मोठी बचत होणार आहे.

Leave a Comment