या पुलांचा वापर करण्यास माणसांना बंदी

puool
जगात सगळीकडेच जसजसे रस्त्यांचे जाळे विणले जाऊ लागले, त्याचप्रमाणात माणसांची प्रवास करण्याची क्षमताही अधिक वाढू लागली. अनेक तऱ्हांची नवनवी वाहने आली. रस्ते बांधताना पूल, ओव्हरब्रिज, बोगदे, वाय डक्ट बांधले जाऊ लागले आणि प्रवास अधिक सुखकर करण्यावर भर दिला गेला. मात्र ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांचे हक्काचे निवासस्थान असलेल्या जंगलातून मार्ग काढले गेले तेथे या वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहिला. अर्थात जगातील अनेक देशांनी याची बूज ठेवली असून केवळ वन्य प्राण्यांसाठी हायवे वर वेगळे मार्ग तयार केले आहेत.

bridge

हे मार्ग कधी हायवेच्या शेजारून जातात, कधी ओव्हरब्रिज, वाय डक्ट, बोगदे, ग्रीन रूफ्स स्वरूपातही जातात. रस्त्याकडेने काटेरी तारा आणि भिती बांधून वन्य प्राण्यांना मार्ग करून दिले गेले आहेत आणि यात नेदरलँड या देशाने आघाडी घेतली आहे. या एकट्या देशात केवळ वन्य प्राण्यांसाठी राखीव असे ६०० वाईल्ड लाइफ क्रॉसिग ब्रिजेस आहेत. येथून जाण्यास माणूसप्राण्याला बंदी आहे.

असाच एक मोठा ब्रिज ट्रान्स कॅनडा हायवेवर बांफ नॅशनल पार्कमधूनही जातो. या हायवेच्या दोन्ही बाजूला नॅशनल पार्क आहे व प्राण्यांना एकीकडून दुसरीकडे जाता यावे यासाठी ओव्हरपास बांधला गेला आहे. अस्वले व अन्य प्राणी या मार्गाचा वापर व्यवस्थित करतात. यामुळे प्राण्यांची सुरक्षितता जपली जातेच पण माणसांच्या वाहनांची वाहतूकही सुरळीत राहते.

Leave a Comment