
औरंगाबाद : एमआयएमचे खासदार असाउद्दीन औवेसी यांनी औरंगाबादेतल्या पत्रकार परिषदेत आरक्षणावरून महाराष्ट्र राज्य सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप केला असून आमचा मुस्लिम आरक्षण हा हक्कच असल्याचे ओवेसी म्हणाले.
फडणवीस सरकारवर ओवेसींची टीकेची तोफ
विरोधकांकडून युती सरकारवर मुस्लिम आरक्षणावरुन टीका होत असतानाच आता एमआयएमनेही सरकारला या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र सरकार मुस्लिम आरक्षणावरुन दुजाभाव करत आहे. मुस्लिम आरक्षण हा हक्क आहे. जर तो भाजपशासित कर्नाटकात आहे तर महाराष्ट्रात का नाही असा सवाल ओवेसींनी राज्यसरकारला केला. तसेच आपण मुस्लिम आरक्षणाचे बिल पास करण्यासाठी अधिवेशन बोलवण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
