प्रवीण दरेकर उद्धव ठाकरेंच्या दरबारी

pravin-darekar
मुंबई : मनसेचा विधानसभेत झालेल्या पराभवानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आपल्याला राजीनाम्यांच्या माध्यामातून याआधीही पाहिलेच आहे पण आता मनसेच्या गडाला हादरे बसत असल्याचे वातावरणच निर्माण झाले आहे. कारण आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मनसे नेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली.

मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची प्रवीण दरेकर यांनी भेट घेतल्याने सेनेच्या वाटेवर दरेकर असल्याची चर्चेला उधाण आले असून काही दिवसांपूर्वीच मनसेतील अंतर्गत वाद काही माजी आमदारांनी चव्हाट्यावर आणला होता. त्यात दरेकर यांचाही समावेश होता. त्यानंतर स्वत: राज ठाकरेंनी प्रवीण दरेकर यांचे नगरसेवक बंधू यांना मिटींगमधून हकालपट्टी केल्याची बातमी ही आली. पण आता मनसेतील धूसफुस चव्हाट्यावर आल्यानंतर प्रवीण दरेकर यांनीही वेगळा मार्ग निवडण्याचे ठरवले असल्याचे दिसत आहे.

Leave a Comment