आदिवासी लोकांच्या बळजबरी धर्मांतरणाचा प्रयत्न

caste-change
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात पाळे खुर्दच्या सरपंच इंदूबाई पवार व पंचायत सदस्य विलास पवार यांच्यासह सहा जणांनी येथे आदिवासी लोकांच्या बळजबरी धर्मांतरणाचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली असून पोलिसांनी चौकशीस प्रारंभ केला आहे. काही मिशनरी प्रचारक ख्रिश्‍चन धर्म स्वीकारण्याचा आग्रह करण्यासाठी येथे येतात. आमच्या देवतांचे फोटो फेकून देणे, हिंदू देवतांबद्दल अपमानास्पद भाषा वापरणे, असे प्रकार सर्रास होतात. त्या प्रकाराला कंटाळून स्थानिक नागरिकांनी देविदास पगारे, विष्णू बागुल, भाऊसाहेब सोनावणे, भरत सोनावणे, शरद सोनावणे, अशोक गोधडे, सुरेश हळदे, मधुकर कुवर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यांचे म्हणणे असे की, ख्रिश्‍चन पालक मधुकर अर्जुन कुंवर हे या गावात येऊन धर्मांतरण करण्यासाठी प्रलोभने दाखवतात. त्यासाठी दमदाटी तर करतातच पण, ५० हजार रुपयांपर्यंतचे आमिषही दाखवितात. त्यामुळे गावातील वातावरण बिघडून गेले आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांना प्रतिबंध करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात ज्यांचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाला अशा नागरिकांनी दिवसभर ठिय्या आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला.

Leave a Comment