भिवंडी – मध्यरात्री तीनच्या सुमारास भिवंडीतील माणकोली गावातील मढवी कंपाऊंड परिसरातील लाकूड भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली होती.
या आगीत होरपळून आतापर्यंत आठ कामगारांचा मृत्यू झाला असून तीन कामगार गंभीररीत्या भाजले असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
भिवंडी लाकूड गोदामाला भीषण आग
अथक प्रयत्नांनी या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले असून या आगीत आणखी किती जिवीतहानी झाली याची खातरजमा करण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून गोदामामध्ये शोधकार्य सुरु आहे.
नेमके किती कामगार रात्रीच्यावेळी या गोदामामध्ये झोपले होते ते स्पष्ट झालेले नसल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.