रावळपिंडी – पाकिस्तानी लष्कराने उत्तर वझरीस्तानातील दहशतवादी तळावर केलेल्या हवाई हल्ल्यात २३ दहशतवादी ठार झाले असून, या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचे जमिनीखाली लपण्याचे भुयारांचे जाळेही उध्वस्त करण्यात आले आहे.
पाकिस्तानी लष्करी कारवाईत २३ दहशतवाद्यांना कंठस्नान
मादा खेल, मेवा खेल आणि लटाका या भागांमध्ये हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यामध्ये मुख्य कमांडर याच्यासह दहशतवाद्यांच्या शस्त्रास्त्रांसह त्यांचे स्फोटके साठवून ठेवण्याचे डेपोही नष्ट करण्यात आले.