मुंबई : न्यूज मोबाईल डॉट इन ह्या न्यूज पोर्टलने अंडरवर्ल्डचा म्होरक्या दाऊद इब्राहिमचा आवाज रेकॉर्ड झाल्याचा दावा केला असून दाऊदचा आवाज पहिल्यांदाच रेकॉर्ड झाल्याचा दावाही या वेबसाइटने केला आहे.
दाऊदचे बस्तान पाकिस्तानातच, न्यूज पोर्टलचा दावा
दुबईतल्या आपल्या पार्टनरसोबत दाऊदचे संभाषण ह्या टेपमध्ये ऐकायला येते आहे. सेटेलाइट सर्विलांसच्या माध्यमातून ही टेप पश्चिमेकडच्या एका गुप्तहेर संघटनेने रेकॉर्ड केल्याचा दावा न्यूज मोबाईल डॉट इनने केला आहे. या रेकॉर्डिंगमुळे दाऊदचा सध्याचा ठिकाणा पाकिस्तानातल्या कराचीत असल्याचा दावाही वेबसाइटने केला आहे.