आयबॉलने त्यांचा अँडी फोर पी आयपीएस जेम स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे आणि आयबॉल अँडी फोर आर्क लाँच करण्याची तयारी केली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट झाले आहेत. मात्र ते ग्राहकांना कधी मिळणार याचा उल्लेख केला गेलेला नाही. फोर पी जेमची किंमत ६४९९ रूपये आहे मात्र आर्कची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.
आयबॉल अँडी फोर पी आयपीएस जेम लाँच
हे दोन्ही स्मार्टफोन ड्युअल सिम आणि चार इंची डिस्प्लेसह आहेत. जेमसाठी अँड्राईड ४.२.२ जेली बिन, एलईडी फ्लॅशसह ५ एमपीच्या रिअर तर ०.३ एमपीचा फ्रंट कॅमेरा,४ जीबी इंटरनल स्टोरेज,३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे तर आर्कसाठी २ एमपीचा रियर व ०.३ एमपीचा फ्रंट कॅमेरा, २ जीबी इंटरनल मेमरी,३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, अँड्राईड किटकॅट ४.४ ओएस दिली गेली आहे.