पेशावर दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा खात्मा

peshawar
पेशावर – पाकिस्तानात याच महिन्यात झालेल्या पेशावर येथील लष्करी शाळेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड सद्दामचा सैन्याच्या कारवाईत खात्मा झाला आहे.

जमरूडमधील गुंडी भागात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या कारवाईत सद्दाम ठार झाला. यावेळी त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आल्याचे खैबर एजन्सीने सांगितले. तेहरीक ए-तालिबान संघनेच्या तारिक गेदार समूहाचा तो सदस्य होता. पेशावरमधील लष्करी शाळेतील हल्ल्यामागचा तो मुख्य सूत्रधार होता.

Leave a Comment