गंभीर अर्थसंकटामुळे रशियात मंत्र्यांची सुट्टी रद्द

putin
रशियातील अर्थसंकट अधिकच गहीरे झाल्यामुळे रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी गुरूवारी सर्व मंत्र्यांच्या नव वर्षाच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचे घोषित केले आहे.

रशियातील कंपन्यात १ जोनवारी ते १२ जानेवारी या काळात नव वर्षाची सुट्टी असते. कामगारांची ही हक्काची सुट्टी आहे. रशियात मुख्य नाताळचा सण ७ जानेवारीला साजरा केला जातो. त्याला आर्थोडोक्स ख्रिसमस असे ओळखले जाते. पुतीन यांनी दूरदर्शनवरून दिलेल्या संदेशात कॅबिनेट मंत्र्यांना नववर्षाची सुट्टी घेता येणार नाही असे जाहीर केले आहे.

यावेळी बोलताना पुतीन म्हणाले की सरकार आणि एजन्सीसाठी इतक्या मोठ्या सुटीचा भार सरकार उचलू शकत नाही निदान या वर्षी तरी नाही. त्यामुळे सर्वांच्या सुट्ट्या रद्द करण्याशिवाय अन्य पर्याय नाही असे त्यांनी जाहीर केले आहे.

Leave a Comment