केंद्रीय सहाय्य योजनेतून नक्षलग्रस्त जिल्ह्यांना ६४ कोटी

vidhansabha
मुंबई – राज्य सरकारने अतिरिक्त केंद्रीय सहाय्य योजनेतून ६४ कोटी रुपये विदर्भातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या विकासासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारकडून नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या मदतीसाठी आलेल्या निधीपैकी राज्य सरकारने प्रत्येकी १६ कोटी रुपयांचा निधी गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांना देण्याचे ठरवले आहे.

निवडक आदिवासी अणि मागास जिल्ह्यांसाठी एकात्मिक कृती आराखडा केंद्र सरकारकडून राबवण्यात येतो. यामध्ये २०१४-१५ या वर्षात विदर्भातील चार नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या अतिरिक्त केंद्रीय सहाय्य योजनेतून १२० कोटींचा निधी दिला जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात राज्य सरकारला ८० कोटी रुपये सूपूर्द करण्यात आले आहेत. तर उरलेला निधी टप्प्याटप्प्यात दिला जाणार आहे.

Leave a Comment