मुंबई – मुंबईतील एक लक्षवेधी काळा घोडा फेस्टिव्हलला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वी या फेस्टिव्हलच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती.
काळा घोडा फेस्टिव्हलला न्यायालयाची परवानगी
या याचिकेत फेस्टिव्हल अन्य ठिकाणी आयोजित करण्याची मागणीही केली होती. मात्र याचिकाकर्त्यांची ही प्रमुख मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच कचरा, ट्राफिक आणि आवाजामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो असे याचिकेत नमूद केले होते. पालिका प्रशासनाला फेस्टिव्हल दरम्यान सफाई कर्मचाऱ्यांची विशेष टीम तयार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ७ ते १५ फेब्रुवारी दरम्यान काळा घोडा फेस्टिव्हलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी सर्व प्रकारच्या प्रदूषण नियंत्रणासाठी कडक उपाययोजना राबवण्याची ताकीद आणि जवाबदारी आयोजकांनी घ्यावी असा आदेश न्यायालयाने दिला आहे.