८५० रुपयात उपलब्ध होणार रक्त – आरोग्य मंत्री दीपक सावंत

blood
नागपूर – राज्याला राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या मंजुरीच्या अनुषंगाने मागील काळात रक्ताच्या किमतीत वाढ करण्यात आल्यामुळे रुग्णांना रक्ताच्या एका बाटलीची किंमत सरकारी रक्त पेढ्यांमध्ये १०५० रुपये इतकी मोजावी लागत होती. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना होत होता. याचा विचार करून, राज्य सरकारने रक्ताचे दर कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची घोषणा आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी विधानसभेत केली.

सर्वात गरजेच्या असलेल्या रक्ताच्या किमतीत तब्बल दीडपट म्हणजे ४५० रुपयांवरून १०५० रुपये एवढी वाढ करण्यात आली होती. या वाढीव १०५० रुपयांवरून दर कमी करून आता तो ८५० रुपये करण्यात आला आहे. यासंदर्भातील घोषणा एका निवेदनाद्वारे राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत केली. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment