महाराष्ट्र केसरीचा फड आजपासून रंगणार

kesari
अहमदनगर : आजपासून अहमदनगरमध्ये ५८व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात होते आहे. राज्यभरातून ४४ संघ आणि शेकडो पैलवानांचा जथ्था नगरमध्ये तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी दाखल झाल्यामुळे आजपासून अस्सल महाराष्ट्राच्या मातीतल्या या खेळाला सुरुवात होणार आहे. ज्यात पैलवानांच्या डावांचा आणि ताकदीचा कस लागेल..

Leave a Comment