कोल्हाटी समाजाची जात पंचायत रद्द करण्याचा निर्णय

kolhati
सांगली : इस्लामपूरमध्ये कोल्हाटी समाज आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये बैठक होऊन कोल्हाटी समाजाची जात पंचायत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जात पंचायतींकडून गेल्या अनेक वर्षांपासून समाजघातकी निर्णय दिले जात होते. जात पंचायतीच्या पंच असणाऱ्या दिलीप जावळे यांनी कोल्हाटी जात पंचायत रद्द केल्याचा लेखी निर्णय पोलिसांना दिल्यामुळे आता जुलमी जात पंचायतीमधून सर्वच कोल्हाटी समाजाची सुटका झाली आहे. इतर समाजांनी देखील असा निर्णय घेऊन समाजाला स्वातंत्र्याची फळे चाखू द्यायला हवी. तरच खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती, विकास होऊ शकेल.

Leave a Comment