अनुष्काला ऑस्ट्रेलियाला जाण्यास परवानगी

virat
मुंबई : बीसीसीआयने अनुष्का शर्माला क्रिकेटर विराट कोहलीच्या सोबतीसाठी परवानगी देऊन दिली आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडसना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात १५ दिवस सोबत राहण्यासाठी बीसीसीआयने परवानगी दिली असून क्रिकेटपटूंच्या पत्नींची राहण्याची व्यवस्था त्याच हॉटेलमधल्या दुसऱ्या एखाद्या रुममध्ये केली जाणार आहे. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार १२ क्रिकेटर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडस ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार असून यामध्ये, एक बॉलिवूड स्टारचादेखील समावेश आहे. त्याचबरोबर भारतीय क्रिकेटपटूंना केवळ चौथ्या टेस्टपर्यंतच राहू शकणार असल्याची तंबी देखील दिली आहे. चौथी टेस्ट १० जानेवारी रोजी सिडनीला संपणार आहे.

Leave a Comment