मेलबर्न – उद्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणा-या तिस-या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघात मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
रैना-भुवनेश्वरला मिळू शकते संधी
भुवनेश्वरचा संघात समावेश झाला तर त्याच्याकडे नवा चेंडू हाताळण्याचे कौशल्य आणि दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची क्षमता असल्यामुळे निश्चितच भारतीय संघाला त्याचा फायदा होऊ शकतो. भुवनेश्वर कुमार पहिल्या दोन सामन्यात पायाच्या घोटयाला झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. बुधवारी भुवनेश्वरने नेटमध्ये गोलंदाजीचा सराव केला यावेळी तो दुखापतीतून सावरलेला दिसत होता.
दुस-या बाजूला डावखुरा फलंदाज सुरेश रैनाची रोहित शर्माच्या जागी संघात वर्णी लागू शकते. या मालिकेत आतापर्यंतच्या दोन कसोटी सामन्यात रोहित अपयशी ठरला असून भारतीय खेळपट्ट्यांवर खो-याने धावा करणा-या रोहितचा परदेशी खेळपट्ट्यांवर अपयशाचा सिलसिला कायम असल्यामुळे तिस-या कसोटीत रोहितच्या जागी सुरेश रैनाला संधी मिळू शकते.