पुणे – सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ‘देश भक्त नथुराम गोडसे’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या मागणी संदर्भात पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
‘देशभक्त नथुराम’ चित्रपटावर बंदीची मागणी
हिंदु महासभेचे सरचिटणीस मुन्ना कुमार शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना या चित्रपटात महात्मा गांधींना हिंदू विरोधी तर नथुराम गोडसेला देशभक्त दाखवण्यात येईल असे सांगितल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला आहे. या याचिकेवर शुक्रवारी सत्र न्यायाधीश एस.एस.नायर सुनावणी करणार असल्याचे याचिकाकर्त्याचे वकील वाजिद खान यांनी सांगितले.
हा चित्रपट ३० जानेवारी २०१५ रोजी प्रदर्शित होणार असून याच दिवशी ३० जानेवारी १९४८ रोजी गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली होती. या चित्रपटामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याची क्षमता असल्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी अशी विनंती याचिकाकर्त्याने न्यायालयाला केली आहे.