आता ऑनलाईन शेणविक्रीही

shen
खरेदी करणे हा मानवाचा विक पॉईंट वस्तू विकणार्‍यांनी बरोबर जोखलेला असतो. पण काय विकायचे किंवा काय विकले जाईल याचा अंदाज बांधून त्याप्रमाणे वस्तू विक्रीला आणणारे खरोखर मनकवडेच म्हणायला हवेत. आता तर ऑनलाईन विक्री सुविधेमुळे जगभरातला ग्राहक या व्यापार्‍यांना एका क्लिकवर उपलब्ध झाला असल्याने केरसुणीपासून ते टोलेजंग घरांपर्यंत सर्व कांही ऑनलाईनवर उपलब्ध झाले आहे. अमेरिकेतील एका वेबसाईट कंपनीने म्हशीचे शेण ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे.

तुम्हाला असे वाटत असेल की शेण कोण विकत घेणार तर हा तुमचा भ्रम आहे. कार्डस अगेन्स्ट ह्युमॅनिटी या नावाने गॅस विकणार्‍या वेबसाईटवर ही शेणविक्री सुरू असून विक्री सुरू झाल्यापासून अवघ्या ३० मिनिटांत शेण खल्लास झाल्याचे सांगितले जात आहे. अवघ्या अर्ध्या तासात शेणाची ३० हजार पॅकेटे प्रत्येक पॅकेटला ३८४ रूपयांच्या दराने हा हा म्हणता विकली गेली. इतकेच नव्हे तर आता शेणखरेदीसाठी प्रतीक्षा यादीही लागली असून आपल्याला आपले शेणाचे पॅकेट कधी मिळणार याची ग्राहक प्रतीक्षा करत आहेत असेही समजते. आता बोला !