अपेक्षित कामे न केल्यामुळे ग्राहक कल्याण सल्लागार समिती बरखास्त

vidhan-bhavan
मुंबई – अपेक्षित असेलेली कामे न केल्यामुळे राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या ग्राहक कल्याण सल्लागार समितीला बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्राहक कल्याण सल्लागार समिती १० मे २००१ मध्ये स्थापन करण्यात आली होती. राज्यात ग्राहक चळवळीला प्रोत्साहन देऊन ही चळवळ ग्रामीण भागात पसरविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच शासनाला सल्ला देण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारला अपेक्षित असलेली कोणतीही कामे या समितीकडून पूर्ण न झाल्याने सरकारने बरखास्तीचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment