सरकारने केला शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग – विखे पाटील

vikhe-patil
नागपूर – राज्य सरकारचे राज्यातील शेतक-याबाबत संवेदना संपली असून गेल्या चार वर्षात थांबलेल्या शेतक-यांच्या आत्महत्या पुन्हा सुरू झाल्याचे पाहायला मिळत असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज हिवाळी अधिवेशनाचे विधानसभेच्या सूप वाजले. त्यापार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी राज्य सरकारवर तोंडसुख घेण्यास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेही चुकले नाही.

दुष्काळग्रस्त शेतक-यांना आघाडी सरकारच्या काळात रोख ९ हजार कोटी रुपयांची मदत केली होती. त्याबरोबरच इतर अनेक माध्यमातून दुष्काळमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्यामुळे आत्महत्येचे सत्र गेल्या चार वर्षात थांबले होते. त्यावेळी केंद्रानेही अनास्था दाखवली. केंद्रीय पथकाने शेतक-यांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली आहेत. एकूणच शेतकरी विरोधी भूमिका पाहायला मिळाली.

Leave a Comment