संजयदत्तला पुन्हा पॅरोल

sanjay
पुणे – येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याला पुन्हा पॅरोलवर सोडले जाणार असल्याचे वृत्त आहे. आज किंवा उद्या संजय १४ दिवसांच्या पॅरोलवर सुटेल असेही समजते. तुरूंगाधिकार्‍यांनी संजयने पॅरोलसाठी अर्ज केला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे मात्र त्याचवेळी त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आज संपत आहे त्यानंतर लगेचच संजयला पॅरोल दिला जाणार आहे.

संजय दत्त १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी येरवड्यात सजा भोगत आहे. गेल्या वर्षात त्याने पत्नीच्या आजाराचे निमित्त करून सुटी घेतली होती. नियमानुसार वर्षातून एकदा शिक्षा भोगत असलेला कैदी १४ दिवस सुट्टीवर जाऊ शकतो. संजयने मागची सुट्टी डिसेंबर २०१३ मध्ये घेतली होती. मात्र तुरूंगात आल्यापासून तो तीन वेळा पॅरोलवर बाहेर आला आहे. आताची सुटी मंजूर झाली तर पॅरोल मिळण्याची त्याची ही चवथी वेळ असेल.

यावेळच्या पॅरोलसाठीच्या अर्जात संजयने कोणतेही कारण दिलेले नाही. नाताळ आणि नवीन वर्ष कुटुंबियांसमवेत साजरे करण्यासाठी आणि पीके चे प्रमोशन यासाठी संजयला ही सुटी हवी असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment