कुंभमेळ्यापर्यंत गोदावरी शुद्धीकरण – मुख्यमंत्री

devendra-fadnvis
नागपूर – मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तरावेळी छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावरील चर्चेत कुंभमेळ्याची सुरुवात होईपर्यंत गोदावरी नदीमधील प्रदूषण नियंत्रणात आणले जाईल व कुंभमेळ्यात गोदावरीचे पाणी शुद्ध मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला. कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विचारलेल्या उपप्रश्‍नावर मुख्यमंत्री म्हणाले की इंडिया बुल बरोबरचा करार तपासून घेतला जाईल, जर करारात महापालिकेचे सांडपाणी इंडिया बुलने शुद्ध करून त्यांच्या स्वतःच्या वापरात आणावे असे असेल तर त्या प्रमाणे सूचना देण्यात येतील.

कुंभमेळ्यासाठी २८०० कोटी रुपयांची योजना कार्यान्वित केलेली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी कुंभ मेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर छगन भुजबळ यांनी विचारणा केली होती की गोदावरी शुद्ध कधी होणार. नदीमधील पाण्याचा गढूळपणा सव्वा दोनशे पटींनी अधिक वाढल्या बद्दल त्यांनी चिंता प्रकट केली होती. तसेच विविध रोगजंतुंचे नदीतील प्रमाण चिंताजनक वाढल्याचेही प्रश्‍नात विचारण्यात आले होते. त्यास उत्तर देताना प्रदूषण नियंत्रण विभागाचे राज्यमंत्री प्रवीण पोटे तसेच मंत्री रामदास कदम यांनी जी उत्तरे दिली त्याने विरोधी सदस्य संतापले. पोटे म्हणत होते की भुजबळ गेली दहा वर्षे तेथरल आमदार आहेत व पालकमंत्री होते. पोटे यांच्या म्हणण्याला सत्तारूढ बाजूंनी जोरदार दाद येत होती तेंव्हा भूजबळ चिडले ते म्हणाले की मी तेथे होतो व काही केले नाही अशा प्रकारचा हेत्वारोप राज्यमंत्री करीत आहेत तेथे अनेक वर्षे याच शिवसेना-भाजपावाल्यांची सत्ता आहे. मी स्वतः गोदावरी नदीची पाहणी केलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात तिथे घाण पाणीच वाहते.

कुंभ मेळ्यासाठी तर देशभरातून करोडो लोक येतील ते हे सारे घाण पाणी पवित्र म्हणून घेऊन जातील. तुम्हाला हायकोर्टानेमध्ये बजावले आहे की नदी शुद्ध करा नाहीतर कुंभ रद्द करावा लागेल. त्यावर मुख्यमंत्री देवेन्द्र ङ्गडणवीस यंनी राज्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ म्हटले की ते तुमच्यावर हेत्वारोप करीत नाहीत. तर प्रकल्पात तुमच्या अनुभवाचा ङ्गायदा घेऊ असे संगत आहेत. गणपतराव देशमुखांनी भुजबळ यांची बाजू लावून धरही आणि म्हटले की जेंव्हा सदस्य स्वतः जाऊन पाहून आले आहेत तेंव्हा ते म्हणतात ते ग्राह्य धरूनच सरकारचे उत्तर यायला हवे. मंत्री कदम यांनी म्हटले की नदीच्या पाण्यात गढूळपणा नाही अशा अर्थी उत्तरात खरे नाही असे नमूद केले आहे. पण प्रदूषण आहे व ते कमी कऱण्याचे उपाय सुरु आहेत. मंत्र्यांच्या उत्तरावर सदस्यांचे समाधान होत नव्हते. तेंव्हा मुख्यमंत्री ङ्गडणवीस यांनी चर्चेत हस्तक्षेप करीत म्हटले की पाण्यातील. गढळपणाचे जे परिमाण आहे त्यामानाने गोदावरीचे पाणी सदस्य खूपच कमी गढूळ आहे. उच्च न्यायालयाने नीरीची एक समिती गोदावरीच्या प्रदूषणाचा तपास करण्यासाठी नेमलेली आहे. तसेच उपाय करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समिती असून ते दर दोन महिन्यांनी उच्च न्यायलयात अहवालही देत आहेत. उच्च न्यायलयाने विभागीय आयुक्तांची समिती चांगले काम करीत आहे या बद्दल समाधानही व्यक्त केल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Leave a Comment