वाराणसीत मोदींचा दौरा-पतंग उडविण्यावर घातली बंदी

kite
वाराणसी – वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी १ दिवसाच्या दौर्‍यावर येणार असल्याने शहरात कांही जागांवर पतंग उडविण्यास तीन दिवस बंदी घातली गेली असल्याचे वृत्त आहे. मोदी ज्या ज्या ठिकाणी भेट देणार आहेत त्या परिसरात ही पतंग बंदी लागू केली गेली आहे. पंतप्रधनांची सुरक्षा लक्षात घेऊन ही बंदी लागू झाल्याचे सांगितले जात आहे.

वाराणसीत गेल्या कांही दिवसांत पतंगाच्या मांज्यामुळे एका महिलाचा जीव गेला आहे तर अनेक लोक जखमी झाले आहेत. पतंगासाठी लावला जाणारा मांजा चीनमधून आलेला अतिशय धारदार मांजा आहे. पतंग उडविताता कुणी चुकून या मांजाच्या फेर्‍यात आलाच तर त्याला चांगलीच दुखापत होते आहे. मोदी भेट देणार्‍या जागांवर पतंग बंदी असली तरी ती मोडली जात नाही ना हे पाहण्याची जबाबदारी आरपीएफ आणि पोलिसांवर देण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मोदी या दौर्‍यात अस्सी घाट, गंगाघाट, डिरेचे मैदान, बनारस हिंदू विद्यापीठ या परिसरात जाणार आहेत त्यामुळे या सर्व भागात तीन दिवस पतंग उडविण्यावर बंदी असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.