मुंबई – राज्यातील युती सरकारने आज आपल्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली असून या यादीनुसार बहुतेक मंत्री, आमदाराने आपआपल्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे.
युती सरकारने जाहीर केली पालकमंत्र्यांची यादी
जाहीर केलेल्या यादीत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना मुंबईचे पालकत्व आणि सेनेच्या सुभाष देसाई यांना मुंबई उपनगराचे पालकत्व देण्यात आले आहे. पुण्याचे पालकमंत्रीपद संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्याकडे आणि जळगावचे पालकत्व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे देण्यात आले आहे.
असे आहेत नवीन पालकमंत्री
विनोद तावडे – मुंबई, सुभाष देसाई – मुंबई उपनगर, एकनाथ शिंदे – ठाणे, गिरीश बापट – पुणे, गिरीश महाजन – नाशिक, एकनाथ खडसे – जळगाव, रामदास कदम – रायगड, विजय शिवतारे – सातारा, प्रविण पोटे – अमरावती.